DA Hike : नवीन वर्षाची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि या नव्या वर्षात नेहमीप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षी अर्थात 2025 मध्ये पहिल्या सहामाहीत तीन टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत 2 टक्के अशी एकूण पाच टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली होती. आता याही वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता गाडीचा लाभ मिळणार आहे. खरे तर , सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपलाय. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. मात्र , नवीन वेतन आयोगासाठीच्या समितीची स्थापना नोव्हेंबर महिन्यात झाली असून या समितीला अभ्यास करण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.
आठव्या वेतन आयोगाची तीन सदस्य समिती दीड वर्षात म्हणजेच साधारणता एप्रिल 2017 मध्ये सरकारकडे आपला अहवाल जमा करणार आहे आणि हा अहवाल सरकारकडे जमा झाल्यानंतर त्यावर शासनाच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला अधिकृतरित्या मंजुरी मिळेल. थोडक्यात आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही 2027 च्या शेवटी किंवा 2028 च्या प्रारंभी होऊ शकते असा एक अंदाज आहे. मात्र नव्या वेतन आयोगाचे अंमलबजावणी कधी पण झाली तरीदेखील नवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानला जाईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आयोगाच्या थकबाकीचा लाभ मिळेल अशा पंचवारच्या सुरू आहेत.

अर्थात या सर्व गोष्टी कधी क्लियर होतील ? जेव्हा सरकार नवीन वेतन आयोगाची घोषणा करेल. दरम्यान जोवर नवा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत राहणार आहे. स्वतः केंद्रातील शासनाच्या माध्यमातून केंद्रीय विधिमंडळात या संदर्भातील माहिती देण्यात आली होती. अशा स्थितीत आता आपण जानेवारी 2026 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढणाऱ यासंदर्भातील माहिती येथे पाहणार आहोत.
जानेवारी महिन्यापासून किती वाढणार महागाई भत्ता?
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरवला जातो. जुलै 2025 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना जी दोन टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आली आहे ती जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरली. आता जानेवारी महिन्यापासून जी वाढ दिली जाईल ती वाढ जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीच्या आकडेवारीवरून ठरणार आहे. दरम्यान अद्याप डिसेंबर 2025 मधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले नाहीत. परंतु जुलै ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमधील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 59.93% इतका होईल असा अंदाज आहे.
म्हणजेच जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दोन टक्के इतकी महागाई भत्ता वाढ मंजूर होण्याची शक्यता आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधी मधील आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी सुद्धा दोन टक्क्यांनीच वाढणार असे चित्र दिसते. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% इतका आहे आणि जर यात दोन टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून 60 टक्के होणार आहे. पण याचा अधिकृत शासन निर्णय हा मार्च महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर याचा अधिकृत जीआर निघाला होता आणि यंदा पण त्याच मुहूर्तावर याचा अधिकृत जीआर जारी केला जाऊ शकतो.













